कल्याण: कल्याण परिसरातील अहिल्यानगर चौक येथे दुकानदाराच्या सतर्कतेमुळे महिला चोर पोलिसांच्या जाळ्यात, महिला चोर सीसीटीव्हीत कैद
Kalyan, Thane | Nov 11, 2025 कल्याण परिसराच्या अहिल्यानगर चौक येथे दिवाळी मध्ये कपड्याच्या दुकानात चोरी झाली होती. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये त्या महिला दिसून आल्या होत्या. पुन्हा आज कल्याणच्या त्याच दुकानदाराच्या दुसऱ्या शाखेत आल्यास चोर महिलांना ओळखले आणि दुकान मालकाने त्यांना पकडून ठेवले. मात्र त्या चावा घेऊ लागल्या तसेच दगड मारू लागल्या. त्यानंतर आजूबाजूचे व्यापारी मदतीला धावले आणि बाजारपेठ पोलिसांना माहिती देऊन या महिला पोलिसांच्या ताब्यात दिल्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.