काटोल: सबकुंड गावामध्ये विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न
Katol, Nagpur | Nov 11, 2025 आज सबकुंड गावामध्ये विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा भव्य आणि उत्साहपूर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रमास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रसंगी ठाकूर यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि गावाच्या पुढील विकास आराखड्याबाबत चर्चा केली.या सोहळ्यात एक कोटी पाच लाख रुपयांच्या खर्चाने रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.