सातारा: महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला जामीन मंजूर, पैलवान संतोष वेताळ यांनी मानले प्रसारमाध्यमांचे आभार
Satara, Satara | Nov 8, 2025 पैलवान सिकंदर शेख यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर, फक्त त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे राहिले होते, मात्र या संदर्भात प्रसार माध्यमांनी आवाज उठवल्या मुळे सिकंदर शेखला जामीन मिळाला आहे, त्यामुळे मी प्रसार माध्यमांचा प्रथम आभार मानतो, असे मत पैलवान संतोष वेताळ यांनी कराड येथे आज, शनिवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता व्यक्त केले.