मोर्शी: वरला येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेच्या शुभारंभ प्रसंगी, ग्रामसभेचे आयोजन
आज दिनांक 17 सप्टेंबरला दुपारी दोन वाजता वरला येथे ग्रामपंचायत कार्यालयात, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेचा शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी ग्रामसेवीका गीता ताई भानगे यांनी उपस्थितांना योजनेबद्दल व्यापक माहिती देऊन, गावाला पारितोषिक मिळवून देण्याकरिता जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन गावातील नागरिकांना केले आहे. यावेळी ग्रामसेविका गीताताई भानगे यांनी उपस्थित यांना योजनेबद्दल माहिती दिली