फलटण: फलटणमध्ये ‘निंबाळकर विरुद्ध निंबाळकर’; आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाने पेटला संघर्ष, रामराजेंनी केली जोरदार टीका
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी जाहीररित्या केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले. “आचारसंहिता लागू असल्याने मी बऱ्याच गोष्टी बोलू शकत नाही, पण सत्य माझ्या बाजूने आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “दूधाभिषेकाचा कार्यक्रम हा राजकीय स्टंट आहे.