हवेली: दत्तनगर चिंचवड येथे अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार
Haveli, Pune | Nov 8, 2025 जुन्या भांडणाच्या कारणावरून एका अल्पवयीन मुलावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी (६ नोव्हेंबर) दुपारी पावणे बारा वाजताच्या सुमारास दत्तनगर, चिंचवड येथे घडली आहे.छैया पातरे, करण दोढे (विद्यानगर, चिंचवड) आणि त्यांचा एक साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.