वर्धा: नगरपालिका निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात वर्धा दणाणले! निशिगंधा वाड, गौरव मोरे यांचा शिवसेना-शिंदे गटाच्या रॅलीत सहभाग
Wardha, Wardha | Dec 1, 2025 नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस! त्यामुळे सर्वच पक्षांनी मतदारांना साद घालण्यासाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच पार्श्वभूमीवर, आज वर्धा शहरात शिवसेना-शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराची भव्य रॅली आज एक डिसेंबर रोजी सकाळी आयोजित करण्यात आली असल्याचे सायंकाळी 5 वाजता प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे