लातूर: माजी आमदार धीरज देशमुख यांचे निवडणूक निकाल एकाच वेळी जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे आणि सरकारकडे आग्रह
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर -माजी आमदार धीरज देशमुख यांनी 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या अनेक नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सोबतच 3 डिसेंबरला या निवडणुकांचे निकाल जाहीर होणार असल्यामुळे, या निकालांचा 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, अशी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांनी सर्व निकाल एकाच वेळेस 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे आणि राज्य सरकारकडे केली आहे.