पीएसआयने चार लाख रुपये उखळल्याचा आरोप; पोलीस अधीक्षक यांना तक्रार
Beed, Beed | Nov 26, 2025 बीड शहरातील, शिवाजीनगर पोलिस स्टेशनमधील पीएसआय गजानन क्षीरसागर व सहकाऱ्यांनी, मुंबईचे सराफ व्यापारी मयंक जैन यांच्याकडून जबरदस्तीने चार लाख रुपये घेतल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांना, बुधवार दि26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता देण्यात आली आहे. व्यापारी बीडमध्ये विशाल लॉजमध्ये थांबले असताना लॉज तपासणीच्या नावाखाली पोलिसांनी सोने, मोबाईल ताब्यात घेऊन सात लाखांची मागणी केली, असा दावा करण्यात आला. रात्री ओळखीच्या लोकांकडून चार लाख रुपये देण्यात आले आणि उर्वरित पैसे न दिल्यास गुन्हे दाखल क