गोंदिया: एरंडी परिसरात वाघोबाने घातला धुमाकूळ भीतीचे वातावरण वनविभागाचा दुर्लक्ष होत असल्याचे आरोप
तालुक्यातील एरंडी बाराभाटी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून वाघाने धुमाकूळ घातला आहे हा वाघ रात्रीच्या वेळेस प्रवेश करून कोंबड्या बकऱ्या आणि पशुधनावर ताव मारत आहे यामुळे गावकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे एरंडी परिसरात 31 ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कालव्याच्या बाजूला बाराभाटी कडून येणाऱ्या रस्त्यालगत दोन महिलांना या वाघाचे दर्शन झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे या परिसरात यापूर्वी सुद्धा या वाघाने एरंडी येथील शेळी व कोंबड्या फस्त केल्या