केज: त्या वाल्मीक करायला फाशी होईपर्यंत शांत बसणार नाही, आमदार संदीप क्षीरसागर यांचे मस्साजोग येथे वक्तव्य
Kaij, Beed | Nov 29, 2025 जोपर्यंत वाल्मीक कराडला फाशी होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही असे मोठे विधान आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साजोग येथे केले. वाल्मिक कराडचा सीडीआर रिपोर्ट काढावा अशी मागणी आपण सुरुवातीपासून करत आहोत. सीडीआर काढल्यास कराड याला कोणी कोणी मदत केली याची माहिती समोर येईल असे संदीप क्षीरसागर म्हणाले. सगळ्यांना वाईट वाटतं, सगळ्या देशमुख कुटुंबाच्या डोळ्यात अश्रू आहेत असे ते म्हणाले. याप्रकरणात सुरुवातीपासूनच क्षीरसागर हे देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभे ठाकल्याचे दिसते.