बारामती: बारामती एमआयडीसी परिसरात तलवार व लोखंडी कोयत्यासह एक जेरबंद
Baramati, Pune | Oct 24, 2025 बारामती एमआयडीसी परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे तलवार आणि लोखंडी कोयता बाळगणाऱ्या व गुन्ह्याच्यावेळी या हत्यारांचा वापर करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली आहे.समर्थ सिद्ध मल्हारे (रा. मालुसरेवस्ती, वंजारवाडी, ता. बारामती) असे या आरोपीचे नाव आहे.