चिखली: जन संपर्क कार्यालय येथे आलेल्या नागरिकांच्या केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सोडवल्या समस्या
मेहकर शहरातील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या नागरिकांशी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी भेट घेतली. त्यांच्या अडचणी, तक्रारी आणि स्थानिक स्तरावरील प्रश्न ऐकून घेतले तसेच संबंधित विभागांमार्फत त्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी आवश्यक त्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने आणि तत्परतेने प्रतिसाद देणे, हीच खरी लोकसेवा आहे, या भावनेतून नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्यांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.