भारतीय संविधान दिनाच्या पवित्र निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. सौ. अर्चनाताई अरुणभाऊ अडसड–रोठे (आक्का) यांनी आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधान दिन साजरा केला.संविधान दिन हा केवळ एका तारखेचा उत्सव नाही, तर समानता, न्याय, बंधुता आणि स्वातंत्र्य या भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांचा गौरव करण्याचा दिवस आहे. याच मूल्यांची पायाभरणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये अचूकपणे केली आहे.