कल्याण: डोंबिवलीत ठाकरे गटाला मोठा धक्का, जिल्हाप्रमुखासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश
Kalyan, Thane | Nov 9, 2025 आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाला डोंबिवलीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत. विधानसभा निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, मात्र त्याच रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत पक्ष प्रवेश करत आहेत. पक्षप्रवेश झाल्यानंतर सर्वांना कारण सांगेल अशी प्रतिक्रिया दीपेश मात्रे यांनी दिली.