साकुरी गावातील डुकरांमध्ये आढळला आफ्रिकन स्वाइन फ्लू... जिल्हा पशु वैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल -* साकुरी गावात डुकरांमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लू आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.. जिल्हा पशु वैद्यकीय पथक साकुरी गावात दाखल झाले असून डुकरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. साकुरी गावात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटना घडत आहेत..