इंदापूर: इंदापूरात बोलेरो जीप आणि हुंडाई कारचा अपघात; जीप रस्त्यावर पलटली, सुदैवाने जीवितहानी नाही
Indapur, Pune | Oct 27, 2025 इंदापूर शहरात इंदापूर-बारामती मार्गावर सरस्वती नगर परिसरात बोलेरो जीप आणि हुंडाई कारचा अपघात झाला. अपघात एवढा जबरदस्त होता की बोलेरो जीप जागीच रस्त्यावर पलटली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती.