यंदाच्या हंगामात कापूस उत्पादनात झालेली घट आणि बाजारातील कमी आवक यामुळे ‘पांढऱ्या सोन्या’च्या दराने मोठी झेप घेतली आहे. सेलू तालुक्यात मध्यम धाग्याच्या कापसाचे दर आज (ता. १९ जानेवारी) दुपारी ४ पर्यंत ₹८,३०० प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले असून व्यापाऱ्यांनी शासनाच्या सीसीआय दरालाही मागे टाकले आहे. अशी माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती कडून प्राप्त झाली.