आज दिनांक 1 डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील भोकरदन ते जालना या मुख्य मार्गावर केदरखेडा गावाजवळ काल दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात होऊन 2अल्पवयीन तरुण ठार झाले,तर 1 जण जखमी आहे,यामध्ये सुरज संजय राऊत वय 17 वर्षे,आयुष्य सतीश पवार वय 15 वर्षे जागीच ठार झाले तर अभय बारवकर हा गंभीर जखमी आहे,अपघाताची नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.