पंचवटी भागातील मखमलाबाद नाका, राजपाल कॉलनी येथे घरफोडी करून चोरट्यांनी दोन लाख 35 हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अनिल दगडू बोराडे राहणार मखमलाबाद नाका, राजपाल कॉलनी, पंचवटी यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. लाकडी कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या पाच अंगठ्या, सोन्याचे 2 ब्रेसलेट, पंचवीस हजारांची रोकड असा मुद्देमाल चोरी करून नेला.