नागपूर शहर: प्रोझोन अपार्टमेंट येथील फ्लॅट नंबर 505 येथे छापा मार कार्यवाही करून ऑनलाइन सट्टा पट्टीचा अजनी पोलिसांनी केला पर्दाफाश
2 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, अजनी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे प्रोझोन अपार्टमेंट येथे फ्लॅट नंबर 505 वर छापा मार कार्यवाही करून ऑनलाइन सट्टा अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तब्बल 24 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींकडून तब्बल 36 लाख 93 हजार 380 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे