चिखली: मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याच्या पुढे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात एक ठार एक गंभीर
मेहकरजवळील फैजलापूर टोल नाक्याच्या पुढे समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मृताचे नाव नावेद अब्बास (वय ५२) तर जखमीचे नाव बिलाल अब्बास झफर असे आहे. दोघेही मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी असून, ते मालवाहू वाहनातून मालेगावकडे जात होते.