शेगाव: काळपांडे जिन येथून ३४ वर्षीय इसम बेपत्ता
शेगाव शहर पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद
काळपांडे जिन येथून ३४ वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची घटना ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. अपूर्व सुरेश मेटांगे वय 34 वर्ष, रा. मानेवाडा, नागपूर हमू काळपांडे जीन हा कर्णाटक येथे कामाला जातो असे सांगून निघून गेला परंतू तो उशिरापर्यंत घरी परत न आल्याने त्यांचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ते कुठेच मिळून आले नाही.यामुळे याबाबत विजय महादेव घोराडे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.