भद्रावती शहरात आधीच दोन ऊद्योग आलेले आहेत.याशिवाय आणखी दोन ऊद्योग येऊ घातले आहे.यामुळे परीसराचा कायापालट होऊन बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल. याशिवाय नगर परिषदेच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना लखपती दीदी करण्यासाठी कार्य केल्या जाईल.असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ शिंदे महाविद्यालयाच्या मैदानावर जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले.त्यात ते बोलत होते.