दारव्हा: वडगाव गाढवे ग्रा. प. गैरव्यवहाराचा ग्रामसभेत आरोप; ग्रामस्थांनी केला जाहीर निषेध
तालुक्यातील वडगाव गाढवे ग्रामपंचायतमधील कामकाजात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचे गंभीर आरोप ग्रामस्थांनी केले असून, दिनांक १७ सप्टेंबरला स. ११ वा बोलावण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी एकमुखाने निषेध नोंदवला.जिल्हा परिषद आरोग्य समितीचे सदस्य विनोद मारोतराव खोडे यांनी सचिव यांना निवेदन दिले.