भंडारा: अज्ञाताने शेतकऱ्याचे धान पेटविले ! ३५ हजारांचे नुकसान ; कनेरी/दगडी येथील दुर्दैवी घटना
कनेरी/दगडी येथील अल्पभूधारक शेतकरी भेनाथ नामदेव लांजेवार यांच्या आयुष्यभराच्या घामाचे प्रतीक असलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञाताने आग लावल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी पहाटे घडली.रुद्र प्रजातीच्या धानाची कापणी करून मळणीसाठी शेतात साठवलेले धान क्षणात जळून खाक झाले. या आगीत शेतकऱ्याचे अंदाजे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले असून मेहनती शेतकऱ्याचे संपूर्ण श्रम एका क्षणात राख झाले. या घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी गीता मेश्राम यांनी पंचनामा केला.