सातारा: पोवई नाका वळणावर पडणाऱ्या सिमेंट काँक्रीटमुळे दुचाकीस्वार धोक्यात
सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांची कारवाईची मागणी
Satara, Satara | Nov 8, 2025 सातारा – पोवई नाका शिवतीर्थाच्या वळणावर गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यावर काँक्रीटच्या गाड्यांतून सिमेंट काँक्रीट पडत असल्याने रस्ता अतिशय घसरडा झाला आहे. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वाढल्या असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संदीप जाधव यांनी संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.