प्रवाशी घेवून जाणारी भरधाव काळी पिवळी उलटल्याने पाच जण गंभीर जखमी झाले. ही घटना २७नोव्हेंबर नोव्हेंबर रोजी सकाळी लोणार ते मेहकर रस्त्यावर पॉवर हाऊसजवळील वळणावर घडली. मेहकर-लोणार मार्गावर मोठ्या प्रमाणात अवैध प्रवासी वाहतूक सुरू असून, लोणार बसस्थानक परिसरात पहिला नंबर मिळवण्यासाठी अनेक काळी-पिवळी चालक वेगाने व निष्काळजीपणे वाहने चालवतात. गुरुवारी सकाळीही तीन काळ्या-पिवळ्या वाहनांमध्ये अशीच शर्यत सुरू होती. पॉवर हाऊसजवळील वळणावर पोहोचताच त्यापैकी एका गाडीवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन चार पलट्या खात शेजारच्या शेतात जाऊन उलटली.