नगरपरिषद निवडणुकीत आज दुपारी २ वाज मतदान प्रक्रियेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा मुद्दा चांगलाच ऐरणीवर आला. अनेक मतदान केंद्रांवर वेळेवर मशीन न चालणे, ओळीत उभ्या मतदारांना पुरेशी व्यवस्था नसणे यामुळे मतदार त्रस्त झाले. काही केंद्रांवर मतदान सुरू होण्यास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त झाली. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागल्याच्या तक्रारी समोर आल्या. निवडणूक प्रक्रियेत झालेल्या त्रुटींना पाहून मतदारांकडून प्रशासनावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.