मोर्शी: खानापूर येथे राहत्या घरात गळफास लावून, युवा शेतकऱ्याची आत्महत्या
आज दिनांक पाच नोव्हेंबरला नुकत्याच प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील खानापूर येथे सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून, पांडे वय 38 वर्ष या युवा शेतकऱ्याने दिनांक चार नोव्हेंबरला 4 वाजता चे दरम्यान आपल्या राहत्या घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. घटनेचा तपास मोर्शी पोलिसांकडून सुरू आहे