शिरूर कासार: शिरुर कासार पोलीस ठाणे हद्दीत साडे पाच वर्षीय चिमुकलीवर नात्यातीलच नारधमाणे केला अत्याचार
शिरूर कासार पोलीस ठाणे हद्दीतून एक अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका साडेपाच वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या नात्यातीलच एका व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेपेक्षाही अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या नराधमावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी गावातील लोकांनी पीडित मुलीच्या आईवर प्रचंड दबाव आणला. बदनामीच्या भीतीने ग्रामस्थांनी चक्क बैठका घेऊन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला.