नागपूर शहर: निशांत अग्रवाल ला दिलासा ; पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांत अग्रवालला तीन वर्ष कारावासाची शिक्षा
पाकिस्तानसाठी हेरगिरी करून भारताची सुरक्षा व अखंडता धोक्यात टाकणारा ब्रह्मोस एयरोस्पेस कंपनीचा देशद्रोही अभियंता निशांत अग्रवाल याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज तीन वर्ष कारावासाची सुधारित शिक्षा सुनावली आहे. हा निर्णय न्यायमूर्ती अनिल किलोवर व प्रवीण पाटील यांनी दिला आहे. पाकिस्तान मधून नेहा शर्मा व पूजा रंजन या नावाने फेसबुक तर सेजल कपूर नावाने लिंक्ड तीन अकाउंट संचालित केले.