अमरावती: अमरावतीत ठाकरे गटाची निवडणूक तयारी जोरात
नगरपरिषदांसाठी इच्छुकांची गर्दी
खासदार सावंत घेत आहेत उमेदवारांच्या मुलाखती
अमरावती जिल्ह्यात होऊ घातलेल्या 10 नगरपरिषद व 2 नगरपंचायत निवडणुतिच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपली निवडणूक मोहीम वेगात सुरू केली आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवार निवड प्रक्रियेला गती मिळाली असून जिल्ह्यातील विविध भागांतील इच्छुकांनी हजेरी लावली आहे. खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या मुलाखती अमरावती येथे सुरू आहे. आतापर्यंत 300 हुन अधिक इच्छुक उमेदवारांनी मुलखातीसाठी सहभाग नोंदविला.