हवेली: वाल्हेकरवाडी येथे उंच इलेक्ट्रीक पोलवर पतंगाच्या मांजामध्ये अडकलेले कबुतर अग्निशमन दलाकडुन सुखरुप सोडण्यात आले
Haveli, Pune | Sep 17, 2025 पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्य अग्निशमन नियंत्रण कक्षाला वाल्हेकरवाडी परिसरात एका उंच खांबावर पतंगाच्या मांज्यामध्ये कबुतर अडकल्याची माहिती प्राप्त झाली. सदर माहिती मिळताच अग्निशमन केंद्राचे अग्निशमन पथक तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, अंदाजे ३० ते ३५ फूट अंतरावर एक कबुतर जखमी अवस्थेत अडकलेला होता. त्याला सुखरूप वाचविण्यात अग्निशामक जवानांना यश आले.