मोहाडी: शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात आढळलेल्या इसमाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू ,घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसात दाखल
मोहाडी शहरातील विठ्ठल रुक्माई मंदिर परिसरात दि. 8 नोव्हेंबर रोजी नागरिकांना एक अनोळखी इसम बेशुद्ध अवस्थेत दिसून आला. यावेळी नागरिकांनी त्याला मोहाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केला मात्र दि. ८ नोव्हेंबर रोज शनिवारला रात्री 9 वा.च्या सुमारास त्या अनोळखी इसमाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस पंचनामा व प्राप्त वैद्यकीय अहवालावरून घटनेचा मर्ग मोहाडी पोलिसात दाखल करण्यात आला आहे.