राहुरी तालुक्यातील गुहा येथे नगर–मनमाड रोडच्या कामासाठी उभारण्यात आलेले मनीषा कन्स्ट्रक्शन कंपनीचे प्रोजेक्ट साईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहे. या ठिकाणी कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा मौल्यवान मशिनरी व साहित्य असल्याने सुरक्षारक्षकाला दमबाजी करून चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल आहे, मात्र अद्याप पोलिसांकडून तपास लागला गेला नसल्याने याचा तपास लावा अशी मागणी कंपनीकडून करण्यात आली आहे. मॅनेजर अमोल धोत्रे यांनी आज गुरुवारी याबाबत माहीती दिली.