मुल नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर मूलच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ झाली आहे. समता परिषदेचे चंद्रपूर पूर्व जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांनी आपल्या सहकार्यांसह आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत आज अधिकृतरित्या भाजपात प्रवेश केला. या घडामोडीने संपूर्ण शहरातील राजकीय वातावरण तापले आहे.