धक्कादायक! पुण्यात शरीर सुखाची मागणी करणाऱ्या नवविवाहितेवर सिगारेटचे चटके. येरवड्यात पतीकडेच शारीरिक संबंधांची मागणी केल्यामुळे नवविवाहितेवर अमानुष अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लग्नानंतरपासून पती तिच्यापासून दूर राहत असून, महिलेने पुढाकार घेतल्यास तो घराबाहेर जाऊन झोपत असे. दोन महिने हा त्रास सहन केल्यानंतर तिने सासरच्या मंडळींकडे तक्रार केली. मात्र मदत न करता तिला गप्प बसण्याची धमकी देत छळ सुरू केला. पतीने तिच्या प्रायव्हेट पार्ट आणि मांडीवर सिगारेटचे चटके द