कराड: योग्य ऊसदर मागणीसाठी शेतकऱ्यांचा रस्ता रोको; तांबवे फाटा येथे शेकाप, बळीराजा संघटना, प्रहार व रासपचे संयुक्त आंदोलन
Karad, Satara | Nov 7, 2025 ऊसाला प्रती टन चार हजार रुपये दर व ३ हजार ७५० रुपयांचा पहिला हप्ता मिळावा या मागणीसाठी आज कराड–पाटण महामार्गावरील तांबवे फाटा साकुर्डी येथे शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष आणि प्रहार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी शेकापचे जिल्हाध्यक्ष ॲड. समीर देसाई म्हणाले, “गेल्या दहा वर्षांपासून ऊस उत्पादकांना योग्य दर मिळत नाही.