तिरोडा: मतदान जागृतीसाठी मेरिटोरियस स्कूलची पुढाकार नोडल अधिकारी विनोद चौधरी यांच्या हस्ते जनजागृती चलचित्राचे विमोचन
Tirora, Gondia | Nov 24, 2025 आगामी नगर परिषद निवडणुका 2 डिसेंबर रोजी होणार असून, नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने मेरिटोरियस स्कूलतर्फे एक आकर्षक जनजागृती चलचित्र तयार करण्यात आले.या चलचित्राचे विमोचन नोडल अधिकारी विनोद चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व स्पष्ट करणारा संदेश दिला. सुबक आणि प्रभावी पद्धतीने तयार केलेल्या या व्हिडिओद्वारे विद्यार्थ्यांनी सर्व नागरिकांना 2 डिसेंबरला मतदान करून लोकशाही प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले.