ठाणे: ऑनलाइन गेमिंग द्वारे तब्बल 84 कोटीची फसवणूक, छापेमारी करून बारा आरोपींना नवी मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Thane, Thane | Nov 9, 2025 नवी मुंबई पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत सायबर फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. डोंबिवली आणि पुण्यामध्ये छापेमारी करून एकूण बारा आरोपींना अटक करून वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल लॅपटॉप डेबिट कार्ड बँकेचे धनादेश असा अठरा लाख पाच हजार रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात यश आले आहे. दोन दिवस सलग पोलिसांनी छापेमारी करून ही उल्लेखनीय कामगिरी केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. यामध्ये 393 तक्रारींचा छडा लावून 84 कोटीची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.