जाती धर्म बाजूला ठेवून मतदान करा, छत्रपती शिवाजी चौकात सामाजिक कार्यकर्त्यांनी हातात बॅनर घेऊन जनजागृती केली
१) बीड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर "जाती-धर्म विरहित बीडच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करा" असा प्रभावी संदेश देत सामाजिक कार्यकर्ते व बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी आज दि.०१ सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जनसंपर्क करत सुजाण मतदारांना विशेष आवाहन केले. डॉ. गणेश ढवळे म्हणाले की, "शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी अशा मुलभूत सुविधांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरून लढणाऱ्या, चळवळीतील प्रामाणिक व सर्वसामान्य का