लातूर: लातूर पोलिसांचा धमाल झटका! तीन महिन्यांचा दरोडेखोरांचा धुमाकूळ थांबला - २४ लाखांचे सोनेचांदीचे दागिने जप्त,एक चोर जेरबंद
Latur, Latur | Dec 1, 2025 लातूर -लातूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून ज्वेलर्स दुकाने, बँका आणि घरांमध्ये घुसून चोरीचा सुळसुळाट चालवणाऱ्या सराईत टोळीने नागरिकांमध्ये भीती पसरवली होती. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने याचा पर्दाफाश करत २० वर्षांच्या रोशनसिंग बबलुसिंग टाकला अटक केली असून, त्याच्या ताब्यातून १३ किलो ७०० ग्रॅम चांदीचे दागिने, ७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करून एकूण २४ लाख १७ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.