ग्रामपंचायत अधिकाऱ्याकडून 25 लाखांची खंडणी मागून 2 लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी हनुमान प्रभाकर दराडे हे ग्रामपंचायत अधिकारी असून आरोपी केशव गुलाब बोडके व दिनकर गुलाब बोडके यांनी संगणमत करून फिर्यादी यांना मोडाळे गावांमध्ये केलेल्या विकास कामांची चौकशी संदर्भात संपर्क केला.कामांच्या विरोधात खोट्या तक्रारी करून दोन लाखांची लाज स्वीकारली व उपोषणाला बसू अशी धमकी देऊन 25 लाखांची मागणी केली.