मलकापूर: शहरातील गोकुलधाम परिसरात तरुणीवर चाकूने हल्ला करून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
मलकापूर शहरातील गोकुळधाम परिसरात ११ नोव्हेंबर रोजी किरकोळ वादातून निर्माण झालेल्या तणावाने उग्र रूप धारण करीत एका २९ वर्षीय युवकाने २५ वर्षीय तरुणीवर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. हल्ल्यानंतर युवकाने स्वतःच्या मानेवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघेही रुग्णालयात उपचार घेत आहेत.याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम विलास झनके विरुद्ध मलकापूर शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.