नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येणस येथे पत्नीने पतीला मोबाईल मध्ये असलेल्या आधार कार्डचा नंबर पाहण्याकरिता मोबाईल मागितल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात पत्नीला लाकडी काठीने मारून जखमी केल्याची तक्रार एका महिलेने चार डिसेंबरला सायंकाळी सात वाजून 41 मिनिटांनी नांदगाव खंडेश्वर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार यातील फिर्यादी व आरोपी हे पती पत्नी असून पती हा दारू पिण्याच्या सवयीचा आहे. घटनेच्या दिवशी पत्नीने मोबाईल मधील आधार कार्डवर असलेला आधार