वायभटवाडी चौकात गावठी पिस्तूल दाखविणारा इसम अटक
Beed, Beed | Nov 24, 2025 बीड तालुक्यातील, वायभटवाडी चौकात गावठी पिस्तूल दाखवत दहशत माजवणाऱ्या संदीप उर्फ रमेश इंगोले (वय ३३) या इसमाला पिंपळनेर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अशी माहिती पिंपनेर पोलिसांनी, सोमवार दि.24 नोव्हेंबर रोजी, सायंकाळी 5 वाजता पोलीस डायरीतून दिली. २३ नोव्हेंबर रोजी आरोपीने लोकांना धमकावत फिर्यादीच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली. माहिती मिळताच सपोनि मधुसुदन घुगे यांच्या पथकाने आरोपीला बीड बायपासवर पकडले. एक गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि स्कॉर्पिओ वाहन जप्त करण्यात आले आहे. फिर्