शिरूर: बिबट्याच्या हल्ल्यात एकही मृत्यू होता कामा नये.. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Shirur, Pune | Nov 6, 2025 पिंपरखेड येथे घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे यापुढे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात एकही मृत्यू होता कामा नये अशा सूचना फॉरेस्ट अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पिंपरखेड येथील भेटीत सांगितले.