भरधाव वेगाने गाडीवरील नियंत्रण सोडल्याने मोठा अपघात झाला आहे. झालेल्या अपघातात दोन जण जागीच मृत्यू पावले आहे. जालना-चिखली महामार्गवरील खडकपूर्णा नदीच्या पुलाजवळ सुसाट वेगाने असलेल्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार कारभारी तुळशीराम पैठणे वय 42, कारभारी संपत बनसोडे 48 दोघेही रा धोत्रा नंदई, ता. दे.राजा यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. 2 डिसेंबर रोजी घडली.याबाबत प्राप्त माहितीनुसार कारभारी बनसोडे व कारभारी पैठणे हे दोघे मोटारसायकलने देऊळगाव राजा वरून देऊळगाव महीकडे येत असताना खडकपूर्णा नदीच्या पुलाजवळ त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटारसायकल वरील नियंत्रण सुटले यामध्ये दोघेही मोटासायकलसह पुलाच्या बाजूला कोसळले.