राहुरी शहराच्या विकासासाठी कर्डिले साहेबांनी भक्कम व्हिजन ठेवले होते. त्यांच्या या विकासात्मक धोरणाचे स्वप्न आता आपण सर्वांनी मिळून साकार करायचे आहे, असे आवाहन युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मतदारांना केले. आज रविवार रात्री राहुरी नगरपालिकेच्या निवडणुकीच्या सांगता प्रचारसभेत ते बोलत होते. शहराचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधा, स्वच्छता व नव्या प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.